Developing and Producing effective electrical and mechanical product solutions
Alliance Panels & Switchgears, popularly known as APS, offers a wide range of medium voltage electrical products, having presence in the domestic and the international market. IECT representative Ashish Rajeshirke visited the stall of APS at the Expo of Ecam held at Pune and had a detailed discussion regarding business. A few excerpts are presented here for the benefit of readers.
Q 1: VCB हा साधारणतः इलेक्ट्रिक फिल्ड मधला महत्वाचा आणि मोठा सेक्शन आहे. You are into VCB and panel boards. तुम्ही काय सांगाल या प्रॉडक्ट बद्दल?
Ans : हे प्रॉडक्ट तस नवीन नाही. २५ वर्षांपूर्वी VCB लाँच झालं. ज्योती लिमिटेड, बडोदा यांनी हा मार्केट मध्ये आणला. याच्या आगोदर ऑइल बेस्ड होतं. जेव्हा इलेकट्रीसिटी सुरु असताना जर फॉल्ट आला, तर R,Y,B हे तीन पॉईंट्स असतात. ते ऑइल मध्ये असायचे. ऑइल खराब व्हायचं. ते सारखं चेंज करायला लागायचं आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. ही टेकनॉलॉजी म्हणजे V,C,B. व्हॅक्युम सर्किट ब्रेकर.
व्हॅक्युमच्या बॉटल्स असतात. त्या बॉटल मध्ये कॉन्टेन्टस असतात. कुठलाही फॉल्ट आला आणि रिले ने तो डिटेक्ट केला, तर तो फॉल्ट रिले सेन्स करतो. आणि कॉईलला देतो. आणि ब्रेकर ऑफ होतो. तो जेव्हा ऑफ होतो तेव्हा त्यातले व्हॅक्युम सेपरेट होतात. पण मीडिया व्हॅक्युम असल्याने ती आत extinguish होते. त्यामुळे ऑइल बदलणं वैगरे प्रकार होत नाहीत. मेंटेनन्स फ्री लाईफ आहे १० हजार ऑपरेशन किंवा ५ वर्षे. पुढे १०० ते १५० वर्षे याला काही पर्याय नाही.
Q 2: मधला कोविडचा जो पिरियड गेला. आता कोविंड नंतर मार्केट ची व व्यवसायाची काय परिस्थिती आहे??
Ans : इंडिया मध्ये इलेक्ट्रिसिटीची डिमांड खूप आहे. चायना आणि इंडिया मध्ये कम्पेअर केलं तर चायनाच मार्केट इंडियाच्या मार्केट पेक्षा १० पट जास्त आहे. आपल्याकडे कित्येक गाव अशी आहेत जिकडे अजून लाईट नाहीत. कारण इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तुमचं जनरेशन झालं. त्यानंतर डिस्ट्रीब्यूशनसाठीसबस्टेशन लागतात. सबस्टेशन मध्ये ट्रान्सफॉर्मर असतात. त्याला हा ब्रेकर लागतो. मोदी साहेब जोरदार काम करतायत. ५ वर्षात कसर भरून काढतील.
Let us hope for the best.. fingers crossed…
Q 3: सध्या प्रत्येक बिजिनेस मध्ये वेगवेळ्याअडचणीअसतात. आता नवीन टेक्नॉलॉजीज येतात. किंवा Online Transactions त्याच्याशी तुम्ही कस डील करता?
Ans : माझ्या बिजिनेसच्या रिलेटेड त्याचा काही फरक पडत नाही. पण ज्या ऑनलाईन ऑर्डर्स बऱ्याच प्रमाणात बघितल्या जातात. आमचं सगळं ई-मेल वर चालतं. Alliance सुद्धा सेवा पुरवतो.
Q 4: हे सगळं करत असताना तुमचे टर्निंग पॉईंट्स किंवा माईल स्टोन्स किंवा कंपनीचा टर्निंग पॉईंट कोणता?
Ans : आताच आमचं महाराष्ट्र approval VCB Product जे आहे ते विकण्याआधी प्रत्येक स्टेजला टेस्टिंग करून मंजूर करावं लागतं. माझा २ वर्षांपूर्वी CPR झाला. पण माझ्याकडे मान्यता नसल्यामुळे मी बचत करू शकलो नाही. आता हे प्रॉडक्ट महाराष्ट्रात MSEB, BMC, आणि सिडको इथे Approve झालं आहे. कोणताही कॉन्ट्रॅक्टर प्रॉडक्ट साठी Apply करू शकतो.
Q 5: Any expansion plan in next 5 years?
Ans : Definitely, we are manufacturing around 10 nos. to 20 nos per year. पण आमची capacity जी आहे ती ३०० ची आहे. याच्यानंतर elecrama आहे. दिल्लीला खूप मोठं प्रदर्शन आहे. ते झाल्यानंतर जे मोठे कॉन्ट्रॅक्टर सध्या गोदरेज कडून घेतायत, L&T कडून घेतायत, आमची overscale असल्यामुळे आणि in house manufacturing असल्यामुळे चांगली कॉस्ट देऊ शकतो. प्रॉडक्ट देऊ शकतो. आणि आजकाल सगळे जाणीवझाले आहेत. तुम्हाला आधीचा अनुभव सांगतो. तेव्हा मी बर्लिनला पण एक्स्पोर्ट केलं होतं. सौदीला सुद्धा त्याच वेळी व्हिजिट केली होती. तेव्हा सौदीचे विचार होते, इंडियन प्रॉडक्ट म्हणजे एकदम बकवास प्रॉडक्ट. त्यावेळी युरोपमध्ये या प्रॉडक्टची कॉस्ट होती १८ लाख.
मात्र त्यावेळी ते हे खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. पण आता सिनॅरिओ पूर्ण चेंज झालाय. आधी ते ऑइल वर अवलंबून असायचे. आता सगळ्यांकडेच ऑइल संपत चाललंय. कुवेत म्हणा, सौदी म्हणा, ओमान म्हणा. आता त्यांचा कल इंडिया कडे आहे. आता ते भारतीय उत्पादन खरेदी करण्यास इच्छूक आहेत. ही चांगली संधी आहे. UAE मध्ये Approval घ्यावं लागतं. पार्टनर घ्यावा लागतो. पूर्ण UAE मध्ये लाच तो निर्बंध आहे.
Q 6: Who are the main competitors in your industry?
Ans : There are many competitors. Gangal, Pascal. बाकीचे MNC आहेत. स्नायडर आहे.
Q 7: आता नवीन तरुण उद्योजक वेगवेगळ्या व्यवसायात उतरत आहेत. बिजिनेस कसलाही असो. तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल ?
Ans : साधारणता नवीन पिढी माझ्या बघण्यात जे आले ते visible मध्ये नसतात. लॅपटॉप, मोबाईल. पण माझ्या फॅक्टरीत जी मुलं काम करायला येतात, त्यांना मुळात फॅक्टरीत काम करण्यात इंटरेस्ट नाही. MBA ची मुलं fieldwork चांगलं करतात. कधी कधी नर्वस होतात. आता मी हे सर्व हॅन्डल करतो. पण माझी पुढची पिढी मुलगा, मुलगी त्यांना ह्यात रस नाही. मेन तोच प्रॉब्लेम आहे. आणि mechanical हा बेस आहे. सगळंच डिजिटल केलं तर कस चालेल?
Digitalisation important आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असत की तुम्ही जोपर्यंत ग्राउंड वर्क करत नाही, तोपर्यंत तुम्हाला success मिळणार नाही. सर्वात Best Mechanical आहे. Automobile sector मध्ये गाडी बनवायला तर कोणीतरी पाहिजे ना? सगळंच digital कस चालेल?
Q 8: एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असून आमच्या कडून आमच्या सारख्या कंपन्यांच्या काय अपेक्षा आहेत?
Ans : चांगल्या मॅगझिन्स मध्ये प्रमोशन करावं. आमच्या सारख्या उत्पादकांना प्रमोट करावं.
Q 9: हा व्यवसायाचा भाग झाला. परंतु व्यवसायाच्या पुढे आपण आपले छंद कसे जोपासता? आपले काय छंद आहेत ?
Ans : व्यवसाय म्हणल्यावर माझं असं म्हणणं आहे की जो बिजिनेसमॅन आहे खरा, त्याने आपला पूर्ण वेळ व्यवसायासाठी न देता ५०% वेळ कुटुंबासाठी आणि स्वतःच्या शरीराला द्यायला हवा. मी फक्त ४ तास काम करतो आणि बाकीचा वेळ माझ्या शरीराला देतो. मला जे करायला आवडतं त्यासाठी देतो. जेव्हा मी मोकळा असतो तेव्हाच मला नवीन विचार सुचतात. तुम्ही १२ तास व्यवसाय करणार. नंतर पण तेच करणार. त्यासाठी तुम्ही माणसं ठेवली पाहिजे. जसा हा Alliance चा व्यवसाय मी सुरु केला. माझा एक मित्र आहे. He looks after everything. मला फक्त बसायचं आहे. तेवढा तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी वेळ मिळतो. माझं म्हणणं एवढंच आहे. प्रत्येकाने माणसं शिकवावी लागतात.